प्रेम करा बघून .....................

 प्रेमाची परिभाषा असते पण ती खूप विभोर असतं 

प्रेमाचा ना आकार असतो पण 

प्रेम प्रेम असतं आणि 

ते अनुभवला कीच कळतं 

प्रेम कधी मोठं नसतं , ना कधी छोटं 

प्रेम हे गहन असतं  जे कधीच खोटं नसतं 

प्रेमाला ना भाषा असते ना प्रांत 

पण हे मात्र खरा आहे कि प्रेमाला कधी अंत नसतो 

प्रेमात सुख असतं , आणि दुःख  पण असतं 

प्रेमात उंच लाटा असतात आणि खोल खाडी सुद्धा असतात पण 

यांचा सामोरे जाणारा एक खंबीर आणि प्रेमळ साथीदार हा असतो बरं 

जो, आपल्याला  यातून हि उभारून यशस्वी व्हायला साथ देतो 

प्रेमात मुसलदार पाऊस हि असतो आणि 

कडकडीत ऊनं  हि असतं 

पण त्यां पाऊसात  देणारा आणि उनात सावली देणारा सुद्धा तोच असतो 

प्रेम जितका सोपं दिसतं तितकचं कठीण असतं  कारण  की 

प्रेम निभावून  घेण्याचं  जे सामर्थ्य लागतं ते  सगळ्यां  मध्ये नसतं  बरं 

प्रेमात देणारा जास्त मुख्य असतो, कारण कि 

तो प्रेमात इतका मग्न होऊन देतो, कि 

तो सर्वस्व देऊन  विलीन होऊन जातो 

तेव्हा ते प्रेम पावित्र  पावतं , आणि हे 

खरं  प्रेम असतं , आणि अश्या 

प्रेमाला कधी खंत नसते जेव्हा ते आपल्या गुरूच्या चरणी अर्पून आपण विलीन होऊन जातो 


Comments

Popular posts from this blog

How to make the best use of Credit Cards?

"मैं"आज आप ही की आग में जल गयी